मराठी ब्लॉग विश्व (marathiblogs.net) वर तथाकथित धर्मरक्षण करणार्या ब्लॉगांनी वात आणला आहे आणि त्या सुरेख सायटीची अगदी कचराकुंडी करुन टाकली आहे. त्यातच मेलमधून फॉरवर्ड आलेल्या कविता आणि दुसर्यांचे ढापलेले पांचट विनोद टाकणार्यांचीही भर पडली आहे.
ही वैतागवाडी होण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस अनेक आवडीच्या लेखकांनी लिहिलेल्या ब्लॉगांची नोंद marathiblogs.net वर दिसली नाही. जृंभणश्वान हे आंतरजालीय मित्र इतके खुसखुशीत लेखन करत आहेत हे मला जीटॉकवर मित्रांशी गप्पा मारताना समजले. ट्युलिप यांनी स्लमडॉग बाबत अतिशय नेमका लेख लिहिला आहे हे एका मित्राने इमेलीतून कळवले. संवेद आणि मेघना यांनी नवे काहीतरी लिहिले आहे हे समजलेच नाही. नंदनसारखे भिडस्त मित्र स्वतःहून अरे मी हे लिहिले आहे ते वाच असे सांगणार नाहीत. च्यायला मग ह्या सायटीचा उपयोग काय?
ह्या सायटीचे स्वरुप धर्माची राजकीय दुकानदारी करणार्यांचे मुखपत्र असे होत आहे याचे दुःख वाटते.रोज सकाळी त्या सायटीवर गेलो की मी हिंदू असल्याने माझ्यावर कसे अन्याय होत आहेत हे वाचून आणखीनच फ्रस्ट्रेशन येते.
पवनरावांनी थोडी चाळणी लावून रोज दहा सनातन नोंदी टाकणार्यांवर नियंत्रण आणावे ही कळकळीची विनंती. :)
Thursday, March 12
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

10 प्रतिसाद:
तुमचं म्हणण खरं आहे.. मी तर तसा आंतर्जालावर नविनच आहे . फारतर दिड - पावणेदोन महिने झाले असतिल मला. तरी पण मलाही जाणवलं.. एखादं पोस्ट असं असेल तर ठिक आहे, पण मला वाटतं कुठला तरी राजकिय पक्ष ह्या ब्लॉगींग चा फायदा घेतोय..
असो..दुर्लक्ष करणे हाच उपाय...

yaavar mI shodhalelaa upaay mhaNAje malaa avaDatat tyanche RSS feeds me Reader madhe ghete. navin lihilele lagech kaLate ani vachata yete.
ya sagaLyacha vaat aalay he matra khare :)
Noted.
काही तांत्रिक कारणांमुळे काही काळ नोंदी व्यवस्थित प्रकाशित होत नव्हत्या. पण आता ती अडचण नसे. मराठी ब्लॉग विश्व आतापर्यंत कसलेही censoring करत आलेले नाही. पण राजकीय आणि धार्मिक अतिशयोक्ती करणारे ब्लॉग्ज वाढले आहेत याबद्दल दुमत नाही. त्याचे नियंत्रण वाचकांनीच करता यावे म्हणून "आक्षेप" नोंदवण्याची प्रक्रिया हा शॉर्ट टर्म उपाय उपलब्ध करणे हा आता पुढील टप्पा आहे.
please include blogs that keep advertising about their ability to predict future.
(Sorry for posting in English)
I think I have a solution for this. I use Google Reader and subscribe to blogs which I like to read. I do not rely on some other site to get the updates from my favourite blogs.
This is not an ad, but try using Google (or any other) reader.
Aapan lihale aahe ki "मी हिंदू असल्याने माझ्यावर कसे अन्याय होत आहेत हे वाचून आणखीनच फ्रस्ट्रेशन येते."
Ase fakt fustrate hot rahilya mulech, hindun var hi sankate yet aahet, aapan fakt frustrate hot rahilo tar aaple ansh hi shillak rahnar nahi,
Aapan lihale aahe ki "ह्या सायटीचे स्वरुप धर्माची राजकीय दुकानदारी करणार्यांचे मुखपत्र असे होत आहे याचे दुःख वाटते." mala asse kutech vatat nahi pratekala vyakti swatantra aahe, va to aaple mudde mandu shakto. ha jar aapnas ase vatat aasel tar ek bab aapan lakshat ghetli pahije hya site var kothe hi dharma che dukan mandale jat nahi, hindun madhe dharmabhiman jagrut karnyacha prayatna kela jat aahe, va to kalanusar aavashyak aahe...
खरय मित्रा..म्हणून मी सगळे ब्लॉग लिस्टून ठेवलेत. पण नए सापडलेले ब्लॉग त्या लिस्टात घालायला कधी वेळ मिळत नाही आणि मग ते निसटतातच
कर्णा, तुझ्याशी सहमत आहे.
च्यायला आजकाल चक्क किटकिट होते अशा लेखांची सुची पाहुन व वैताग वाढतो ...
आधी सुरवातीला आम्ही विनोद म्हणुन असे लेख वाचायचा प्रयत्न केला पण आता तेही जमेना, दिवसेंदिवस प्रकरण गंभीर होत चालले आहे ...
असो. आपल्याला ते काय लिहतात ह्याच्याशी मतलब नाही, त्यांनी जरुर मेगाबाईटच्या मेगाबाईट भरुन लिहावे, आमची काहीही हरकत नाही ...
बाकी पवनरावांने त्यांची बाजु मांडलीच आहे ...
आपल्या पुरता उपाय :
आवडते ब्लॉग फॉलोव्ह करणे अथवा बुकमार्क करुन थोडा त्रास घेऊन वारंवार चाळुन पहाणे, मी हेच करतो ...
तसेही "हरेकॄष्णजीं"च्या ब्लॉगवर सर्वांच्या लिंक्स आणि त्यांचे रिसेंट अपडेट्स सापडण्याची सोय आहेच ना, वापरा मग ती ...
:)

टिप्पणी पोस्ट करा