मा*. कौतिकराव ठाले पाटील साहेब,
लिहिन्यास अत्यंत दुक्ख व्हते की तुम्ही म्हराटी साहित्य स्म्मेलन ह्ये यूयेस मधी (म्हंजी आमेरिकेत) घ्येन्याचे ठरिवले हाये आसे आम्हास कळले हाये.
ह्या निर्नय घेऊन आम्च्यासारख्या समस्त धंदेवाईकांना तुम्ही मधलं बोट दाखिवलंय. ह्या निर्नयाचे आमास्नी आजाबात कौतिक वाटत न्हाई. खालच्या साईडला डाव्या हाताचा आंगठा छापून आम्ही तुम्चा हिते जाहीर लेखी निशेध करत आहोत.
--
आजानुकर्न पुनेकर
सही निशानि डाव्या हाताचा आंगठा
( केटरिंग, खुर्च्या, गाद्या, गिरद्या, पडदे, ष्टेज, लाऊस्पीकर, वडापाव व चहाच्या गाड्या यांचे होलसेल एजंट - साहित्य स्म्मेलन स्पेशालिष्ट)
ता.क. १:
* मा. = माननीय.
उगीच धावती** गाढवं आंगावर घेन्याची आजाबात विच्छा न्हाई.
ता.क. २:
**धावती गाढवं: "धावती गाढवं" हे येका मराठी (व त्याच्या मुळंच पुने, स्यानफ्र्यांसिस्को वगैरे जागतिक म्हराटी ठिकानी जगप्रसिद्ध आसलेल्या) वाक्प्रचाराचे इम्प्रोव्हायझेषन हाये!
Tuesday, June 24
Wednesday, June 18
लावूनि कोलीत । आपुला करितील घात ॥
भले शाब्बास संजय राऊतसाहेब. या लेखात तुम्ही सनातनवाल्यांची फुलटूच केलेली वाचोन आम्हास परमसंतोष झाला आहे.
अहो मिशा चिकटवोनी का कोणास मावळा होता येते? जे कृत्य करण्याचे लायसन फक्त शिववडावाल्यांना आहे ते कृत्य असे ऐर्यागैर्यांनी स्वत:च्या शिरावर घेतले की त्यांची मानगूट मोडोन त्यांचा फजितवडा होणार हे तर विधिलिखितच आहे.
बॉम्बस्फोट झाल्यावर आमचे (आणि तुम्ही ज्यांना तीनचारदा गारद केले आहे त्या बोरूबहाद्दर दाढीवाल्या वागळ्यांचेही) हेच मत होते की सनातनवाल्यांनी हिंदूंची इज्जत घालवली. कितीदा सरळ केले तरी वागळ्यांच्या दाढीचे केस वाकडेच! साल्याला एकदा खोपच्यात घेवोनी काही समज देणे तुरंत गरजेचे आहे.
आपले 'हिंदूंची इज्जत जाण्याचे कारण बॉम्बस्फोट हे नसून स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब फुसके होते' हे नेमके वाक्य वाचून आम्ही वागळ्यांना विसरोन सेनेविषयीच्या अभिमानाने आमचा ऊर भरोनी आला आणि बाराबंदीचे तीन बंद तुटले. असो. धर्मासाठी (दुसर्यांचे) प्राण हाती घेणार्या मराठ्यांच्या राज्यात तीन बंदांची काय किंमत.
आजकाल आम्ही आपल्य पेप्रामध्ये असेही वाचत आहोत की सर्वत्र गनिमांनी धुमाकूळ घातला आहे. हिरव्या आक्रमणामुळे अवघे स्वराज्य हातातून जाते की काय अशी कंडिशन आलेली आहे. तुम्ही असेही लिहिता की काटेसे काटा निकालना चाहिये!
या आक्रमणाला हिंदुत्त्वाच्या वज्रमुठीनेच जवाब देवोन अवघ्या राज्यात भगव्याच्या शिलेदारांच्या तोफा धडाडल्या पाहिजेत, बॉम्बचे स्फोट झाले पाहिजेत. मात्र मुठीचा एकमेव उपयोग बोंबा मारणे एवढेच ज्या नामर्दांना ठाऊक आहे त्यांचे डोळे उघडो न उघडो मात्र आमचे डोळे साफ उघडले आहेत. हिंदूंनी जिहाद पुकारण्याची वेळ आली आहे.
गुस्ताखी माफ असावी पण आम्हालाही एक सूचना करावीशी वाटत आहे. हर एक गावातील आपल्या छावण्यांमध्ये शिवबॉम्ब बनवण्याचे कुटीलोद्योग चालू करावेत. याच देशातल्या परप्रांतीय गनिमांनी गावोगाव मराठी माणसाचे धंदे हिसकावोन स्वत:चे बस्तान बांधले आहे. त्यांना यवन आणि म्लेंच्छही सामील आहेत. हे स्वराज्याविरोधातले मोठेच कारस्थान आहे. मात्र येकवार शिवबॉम्बचे बार सुरु झाले की बेरोजगार हिंदू मराठी तरूणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होवोन सर्वत्र आबादीआबाद होईल व हिरव्या गनिमांना पळता भुई थोडी होईल. 'शिवबॉम्बचे बार' मधील 'बार' या शब्दाला आबा डोळे वटारतील. मात्र असे गाजरपारखी स्वराज्यात असायचेच. त्यांनी ज्यास्ती तकलीफ दिली तर 'स्फोट' म्हणा येवढेच आमचे सांगणे.
मात्र तुम्ही लेखामध्ये टिळकांचे नाव घेतलेले मात्र आम्हास पसंत नाही. ही अशी नावे वाचून आम्हाला चकण्यात खौट वाटाणा यावा तसे होते. बॉम्ब बनवायचे सोडोन उगीच बोरू घासत बसण्याचे काम करणार्या मंडळींना ज्यास्ती महत्त्व देणे काय कामाचे? आम्ही तर म्हणतो त्यांनी देखील हिंदूंची इज्जतच घालवली होती. नशीब चांगले की या महाराष्ट्रभूमीत शिवरायांच्या नावाने एक सेना (आणि नंतर वडा) निर्माण झाला आणि गेलेली इज्जत थोडी का होईना परत आली. सगळी इज्जत परत आणायची असेल तर शिवबॉम्बचे तेवढे मनावर घ्यावे!
तसे झाल्यास आम्ही आपणास ग्यारंटी देतो की येत्या निवडणुकीत आम्ही बॉम्बचेच सॉरी धनुक्ष्यबाणाचेच बटण दाबतो.

याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)