खालील लेख हा उबुंटू व तत्सम डेबियन आधारित लायनक्स फ्लेवरसाठी लिहिला आहे. मात्र थोडे बदल करुन या सूचना इतर फ्लेवरांसाठीही चालाव्यात.
अनेक मराठी सायटींवर मराठी टायपिंगची सोय उपलब्ध आहे. मात्र ही सोय इतर ठिकाणी (उदा. गूगल टॉक, इमेल, ब्लॉग वगैरे) वापरणे हे गैरसोयीचे आहे. या ठिकाणी मराठी टायपून पाठवायचे असेल तर गमभन किंवा तत्सम खिडकीत टायपिंग करावे लागते व नंतर तेथून उचलून घ्यावे लागते. जे गूगलटॉक वगैरेसाठी फारच उपद्व्यापी आहे. शिवाय गमभनमध्ये ऑटो सेवसारखी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे एकदा गमभन लटकले किंवा फायरफॉक्स लटकले किंवा दुसरी काही अडचण आली तर लिहिलेले सगळे पाण्यात जाते. याउलट इमेल/ब्लॉगमध्ये देण्यात येणारी ऑटो सेवची सोय वापरण्यासाठी त्याच खिडकीत मराठी टायपिंग करणे फार उपयुक्त आहे.विंडोज वापरकर्त्यांना मराठी सायटींव्यतिरिक्त इतर ठिकाणी टायपिंग करण्यासाठी बरहा उपलब्ध आहे. मात्र लायनक्स वापरकर्त्यांना ती सोय नाही. मात्र त्याऐवजी लायनक्स वापरकर्त्यांना खालील पर्याय उपलब्ध आहेत.
१. लायनक्सने दिलेला देवनागरी कीबोर्ड वापरणे२. बोलनागरी
३. एससीआयएम (स्मार्ट कॉमन इनपुट मेथड)
मात्र एससीआयएम हा साधा-सोपा-सुबक-ठेंगणा असा एक मस्त प्रकार आहे. लायनक्समध्ये देवनागरी टायपिंगसाठी यापेक्षा दुसरा सोयीस्कर मार्ग मला सापडला नाही.
एससीआयएम-देवनागरीसाठीच्या पूर्ण सूचना मात्र इंटरनेटवर लवकर मिळत नाहीत. ज्या मिळतात त्या बऱ्यापैकी अपुऱ्या आहेत त्यामुळे एससीआयएम टाकूनसुद्धा हवा तो कळफलक न दिसणे वगैरे अडचणी येतात. मराठी टायपिंग ही अनेकांची गरज झाली आहे त्यामुळे मराठी टायपिंग न येणे हे लायनक्सपासून घटस्फोट घेण्यासाठीचे महत्त्वाचे कारण ठरु शकते.मात्र खालील पायऱ्या वापरल्या तर देवनागरीसाठी इनस्क्रिप्ट व फोनेटिक कीबोर्ड खात्रीने उपलब्ध होतील.
१. सिस्टम->;ऍडमिनिस्ट्रेशन->;सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमध्ये जा.२. तुमचा पासवर्ड द्या.
३. सर्च वर क्लिक करा व तिथे scim असे टाईप करा.
४. शोधून आलेल्यांपैकी खालील पॅकेजे निवडाः
scim, scim-m17n, scim-gtk2-immodule, im-switch, libscim8c2a, scim-modules-socket, scim-modules-table, scim-qtimm, scim-tables-additional
५. आता पुन्हा सर्च वर क्लिक करा व तिथे m17n टाईप करा.
६. शोधून आलेल्यांपैकी खालील पॅकेजे निवडा.
m17n-db, libm17n-0
७. आता पुन्हा सर्चवर क्लिक करा व तिथे marathi टाईप करा. त्यातून मराठीसाठी खालील पॅकेजे निवडा
language-support-fonts-mr, language-support-mr, language-support-writing-mr, ttf-devanagari-fonts,
८ आता ऍप्लाय वर क्लिक करा.
एससीआयएमची सर्व पॅकेजे इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही एससीआयएम वापरु शकता. एससीआयएम चालू करण्यासाठी सिस्टम->;प्रेफरन्सेस मध्ये एससीआयएम इनपुट मेथड सेटप मिळेल. त्यात IMEngine मधील Global Setup मध्ये हिंदीमध्ये जा. तेथे hi-trans, Inscript आणि Phonetic मिळेल. त्यापैकी hi-trans निवडल्यास ते गमभन/बरहा प्रमाणे फोनेटिक टायपिंगसाठी वापरता येईल.
एससीआयएम चालू होते तेव्हा टास्कबारवर छोटे टाईपरायटरचे चित्र दिसते.एससीआयएम वापरून इंग्लिश टायपिंगही करता येते त्यामुळे प्रत्येक वेळी मराठी टायपिंग करण्यासाठी एससीआयएम चालू करण्याची गरज नाही. एससीआयएम कायम चालू ठेवता येते. सिस्टम चालू होताना एससीआयएम आपोआप चालू होण्यासाठी
सिस्टम->;प्रेफरन्सेस->;सेशन्स उघडा. त्यात स्टार्टप प्रोग्रॅममध्ये scim-d या कमांडसाठी नवा प्रोग्रॅम टाका. आता प्रत्येकवेळी उबुंटू चालू कराल तेव्हा एससीआयएम आपोआप चालू होईल.
काही अडचणी आल्यास विचारा.
एन्जॉयमाडी.
4 प्रतिसाद:
तुमचा ब्लॉग व सर्वच लेखन आवडले !
माझे काहि प्रश्न !
लिनक्स ची सुरवात कशी करावी? लिनक्स चा कुठला फ्लेवर सोपा आणि युजर फ्रेन्डली आहे? प्रि-इन्स्टॉल्ड लिनक्स लॅपटॉप मिळतात का? कुठला घ्यावा ?
सध्याच्या लोकप्रिय फ्लेवरांमध्ये उबुंटू आणि फेडोरा आहेत. त्यापैकी मी उबुंटू वापरले आहे. इनस्टॉल करायला आणि वापरायला फार सोपे आहे. www.ubuntu.com वरुन उबुंटू डाऊनलोड करता येईल. किंवा त्याची सीडी (पूर्णपणे फुकट) मागवता येईल.
डेलचे प्रिइन्स्टॉल लॅपटॉपही मिळतात. www.dell.com/ubuntu. मात्र उबुंटू इन्स्टॉल करणेही तितकेसे अवघड नाही. सावधगिरी म्हणून विंडोजची सिस्टम रिकवरी डिस्क बनवून ठेवा.
उबुंटू लायनक्स सुरुवातीला लाईव सीडी म्हणून वापरुन पाहा. (इन्स्टॉल न करता सीडीवरूनच वापरता येते. फक्त त्यात वायरलेस नेटवर्क वगैरे कदाचित चालणार नाही. बाकी सगळे व्यवस्थित चालेल).
नंतर विंडोजमध्ये एक ऍप्लिकेशन म्हणून टाकून पाहा. तिथे ड्रायवर वगैरे टाकता येतील. शिवाय विंडोजचे प्रोग्रॅमही वापरता येतील.
नंतर सवय झाल्यावर उबुंटूला ऑपरेटिंग सिस्टम म्हणून टाकू शकता. विंडोजवर असलेल्या सर्व ऍप्लिकेशनांना उत्तम पर्याय उबुंटूमध्ये उपलब्ध आहेत.
Hi,
Sorry for english.
>>एससीआयएम चालू होते तेव्हा टास्कबारवर छोटे टाईपरायटरचे चित्र दिसते.
एससीआयएम वापरून इंग्लिश टायपिंगही करता येते त्यामुळे प्रत्येक वेळी मराठी टायपिंग करण्यासाठी एससीआयएम चालू करण्याची गरज नाही. एससीआयएम कायम चालू ठेवता येते. सिस्टम चालू होताना एससीआयएम आपोआप चालू होण्यासाठी
सिस्टम->;प्रेफरन्सेस->;सेशन्स उघडा. त्यात स्टार्टप प्रोग्रॅममध्ये scim-d या कमांडसाठी नवा प्रोग्रॅम टाका. आता प्रत्येकवेळी उबुंटू चालू कराल तेव्हा एससीआयएम आपोआप चालू होईल.
एससीआयएम बरोबर थोडे खेळा. त्यात तुम्हाला इंग्लिश-मराठी बदलण्यासाठी ctrl+space किंवा ज्या आवडतील त्या जोड्या ठरवता येतील.<<
I successfully installed scim as per your instructions. As you have mentioned, it shows up on the taskbar once started. However, how to use it for wordprocessing is not still clear. In baraha, the moment, one starts baraha direct, it becomes applicable to all the applications. Do I need to do something extra to type in hindi/marathi and switching between these and english?
by default, all the languages are selected in the setup. As far as I understood from your explaination, I need to disable all the languages and then select hindi and hi-tran. Am I right?
Please explain the process at the earliest.
Marathi typing was the only thing for which, I was dependent on windows. I installed scim as I came to know from one of my friends, recently. However, the process was not clear. From your post, I have succeeded in a few steps.
Thank you.
-Prashant
प्रशांत,
SCIM वापरण्यासाठी SCIM ला scim -d असे चालू करा.
टाईपरायटरचे चित्र दिसू लागेल (जे तुमच्याकडे आधीच दिसत आहे.)
त्यावर Right Click करुन SCIM Setup मध्ये जा.
तिथे फ्रंट एन्ड खाली ग्लोबल सेटप दिसेल.तिथे नेक्स्ट इनपुट मेथड मध्ये control+space निवडा. प्रिवियस इनपुट मेथड मध्ये Shift+control+space निवडा.
आता IMEngine मधल्या ग्लोबल सेटप मध्ये जाऊन इंग्लिश आणि हिंदी(hi-trans किंवा inscript) निवडा.
आता ओके वर क्लिक करुन बंद करा.
तुम्ही कोणत्याही टाईप करता येण्याजोग्या ठिकाणी कर्सर असताना control+space दाबले की SCIM इंग्लिश चालू होईल. पुन्हा control+space दाबले की हिंदी.
असे control+space वापरुन तुम्ही हिंदी-इंग्लिश-हिंदी असे स्विच करु शकता.
टिप्पणी पोस्ट करा