बरखा दत्त बाईंच्या एकंदर पत्रकारितेवर आजकाल बरेच आक्षेप घेतले जात आहेत. कालच कुठेतरी वाचले की या बाईंनी कॅमेऱ्यासमोर कोणालातरी विचारले, "तुमचे नातेवाईक ताज हॉटेलात अडकले आहेत, ते जिवंत असतील असे तुम्हाला वाटते का?" आणि या बाईंबरोबर असलेल्या कोणा पत्रकाराने एका पोलीसाला विचारले "डेड बॉडीज की कंडिशन क्या है?"!!
असो. आता या बातम्यांचे काही वाटत नाही. मी बराच कोडगा आणि निगरगट्ट झालो आहे. त्याचा पुरावा म्हणजे या बाईंच्या पत्रकारितेमुळे "दत्त म्हणून उभे राहणे" या मराठी वाक्प्रचाराला एक वेगळा अर्थ येईल असे मला कालपासून वाटत आहे.
Friday, December 5
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

2 प्रतिसाद:
अजानुकर्ण, तुमचा संताप समजण्याजोगा आहे. टिव्ही पत्रकारांचे समर्थन नाही, परंतु एकदा इथे http://www.ndtv.com/convergence/ndtv/mumbaiterrorstrike/Story.aspx?ID=COLEN20080075194&type=opinion
दुसरी बाजु देखिल जरुर वाचुन पाहा.
प्रसंग नि परिस्थिती हसण्यासारखी नाही, पण शेवटचं वाक्य वाचून हसू आलंच..हे वाचलंत का तुम्ही?
http://www.ndtv.com/convergence/ndtv/mumbaiterrorstrike/Story.aspx?ID=COLEN20080075194&type=opinion
टिप्पणी पोस्ट करा