"चक दे इंडिया" हा हिंदी चित्रपट आहे हे मला शेवटी कळल्यावर प्रचंड आश्चर्य आणि आनंदही वाटला. मला इतके दिवस तो CHAK DE INDIA असा फ्रेंच चित्रपट वाटत होता. या चित्रपटाच्या बोळकांडीतून शाहरुखची गटारगंगा फ्रेंच चित्रपटसृष्टीत आणि पुढे हॉलीवूडमध्ये वगैरे वाहत जाते की काय अशी भीती वाटत होती.
कधी नाही ते मोरया गोसावीला एक नारळ फोडून आलो आणि चक दे इंडिया हा हिंदीच चित्रपट आहे हे समजल्यावर सुटकेचा निश्वास सोडला.
असो.
चक दे चा अर्थ काय आहे? लहानपणी गोट्या खेळताना कुणाचा डाव पहिला हे ठरवायला आम्ही "चकत" होतो. त्यातलाच हा प्रकार आहे का? चक-दे इंडिया म्हणजे सगळे इंडियन हातात गोट्या घेऊन चकत आहेत वगैरे. ;)
