(मी सोडून) सर्वांचा लाडका अभिनेता शाहरूख खान अमिताभच्या डॉन नंतर आता अमिताभच्याच केबीसी मध्ये पण काम करणार हे ऐकून काय करावं काही कळेनासं झालंय. नवीन डॉनला सगळ्यांनी घातलेल्या शिव्या बहुतेक किंग खानने ऐकलेल्या नसाव्यात किंवा तो बहिरा झाला असावा किंवा बहिरा होण्याची (त्याला न जमणारी) ऍक्टींग करत असावा.
स्टार टीव्हीवाल्यांचं पण बहुतेक डोकं फिरलं असावं. अमिताभ उपलब्ध नाही म्हणून शाहरुखला केबीसी करायला लावणं म्हणजे जंगलात सिंह नाही म्हणून कोल्ह्याला राजा बनवण्यासारखं आहे. आणि शाहरुख इतका प्रेडिक्टेबल आहे की अमुकतमुक वाक्य बोलल्यावर तो नाक खाजवणार का डोकं खाजवणार का उजवी भुवई वर आणि डावी भुवई खाली करून त्याचं ते डोक्यात जाणारं (सो क्यूट!) स्मितहास्य दाखवणार हे ओळखायला कार्यक्रम बघण्याची पण काय गरज नाही.
स्टार टीव्हीच्या म्हणण्याप्रमाणे मात्र शाहरुखमुळे केबीसी ला Gen Now लूक मिळेल.
अरे, शाहरुख जर Gen Now असेल तर मग ह्या हिशोबानी मी तर आता ह्या वेळेला पाळण्यात अंगाई गीत ऐकत असलो पाहिजे.
Gen Now (तुम्ही वाचत असाल तर) मी तुमच्याबरोबर नाही हे परत एकदा ओरडून सांगतो.
Tuesday, November 28
क..क..क.. कौन बनेगा करोडपती
Labels:
शाहरुख
Subscribe to:
Posts (Atom)
